महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी, ज्याला सामान्यतः “महानिर्मिती” म्हणून ओळखले जाते, ही महाराष्ट्रातील वीज निर्मिती क्षेत्रातील प्रमुख संस्था आहे. महानिर्मितीने नुकतीच तंत्रज्ञ-3 पदासाठी 800 जागांची भरती जाहीर केली आहे. वीज निर्मितीमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही एक मोठी संधी आहे.या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता, अर्ज प्रक्रिया, वयोमर्यादा आणि इतर तपशील खाली दिले आहेत. या भरतीविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.
पदाचे नाव आणि तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | तंत्रज्ञ – 3 | 800 |
Total | 800 |
शैक्षणिक पात्रता :
तंत्रज्ञ-3 पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे खालील संबंधित क्षेत्रांमध्ये ITI NCTVT/MSCVT चे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे:
- इलेक्ट्रिशियन (वीजतंत्री)
- वायरमन (तारतंत्री)
- मशिनिस्ट (यंत्र कारागीर)
- फिटर (जोडारी)
- इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक
- इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी & इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम मेंटेनन्स
- इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम
- वेल्डर (संधाता)
- इन्स्ट्रयुमेंट मेकॅनिक
- ऑपरेटर कम मेकॅनिक पोल्युशन कंट्रोल इक्वीपमेंट
- बॉयलर अटेंडन्स
- स्विच बोर्ड अटेंडन्स
- स्टिम टर्बाईन ऑक्झीलरी प्लॅन्ट ऑपरेटर
- स्टिम टर्बाईन ऑपरेटर
- ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरिअल हॅंडलिंग इक्वीपमेंट
- ऑपरेटर कम मेकॅनिक (पॉवर प्लॅन्ट)
वयोमर्यादा
- 01 ऑक्टोबर 2024 रोजी वय:
- सामान्य प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे
- मागासवर्गीय उमेदवारांसाठी: वयात 05 वर्षांची सूट (अधिकतम वयोमर्यादा 43 वर्षे)
नोकरीचे ठिकाण: महाराष्ट्र
अर्ज पद्धत: ऑनलाईन
अर्ज शुल्क
- खुला प्रवर्ग: ₹500/-
- मागास प्रवर्ग: ₹300/-
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जानेवारी 2025
- परीक्षेची तारीख: अद्याप जाहीर नाही (नंतर कळविण्यात येईल)
जाहिरात PDF | येथे क्लिक करा ! |
Online अर्ज | येथे क्लिक करा ! |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा ! |
महानिर्मिती कंपनीत नोकरीचे फायदे
महानिर्मिती कंपनीत नोकरी केल्यामुळे उमेदवारांना स्थिरता, चांगला पगार, वीज क्षेत्रातील अनुभव, आणि इतर शासकीय सुविधांचा लाभ मिळतो. वीज निर्मितीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी ही उमेदवारांसाठी करिअरची एक मोठी झेप ठरू शकते.
उमेदवारांनसाठी महत्त्वाची सूचना:
- उमेदवारांनी अर्ज करण्याआधी सर्व अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचाव्यात.
- अर्जामध्ये कोणतीही चूक झाल्यास तो अर्ज बाद केला जाऊ शकतो.
- परीक्षा व इतर महत्त्वाच्या सूचना वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केल्या जातील.
महानिर्मितीच्या या भरतीद्वारे तुम्हाला वीज निर्मिती क्षेत्रात काम करण्याची उत्तम संधी मिळू शकते. ITI केलेल्या तरुणांनी यासाठी तात्काळ अर्ज करून संधीचा लाभ घ्यावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2024 असल्यामुळे वेळेत अर्ज करण्यास विसरू नका.