AAI Bharti 2025: भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती

WhatsApp Group Join Now

एअरपोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) मार्फत ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती GATE 2023, GATE 2024 आणि GATE 2025 स्कोअरच्या आधारे केली जाणार असून, एकूण 976 रिक्त पदे विविध शाखांमध्ये उपलब्ध आहेत. यात आर्किटेक्चर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अशा विविध विभागांचा समावेश आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे, कारण निवड प्रक्रियेत केवळ GATE स्कोअर विचारात घेतला जाणार आहे, कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत नाही. निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी ₹40,000 ते ₹1,40,000 (IDA पद्धतीने) आणि वार्षिक अंदाजे ₹13 लाख CTC तसेच भत्ते, HRA, वैद्यकीय सुविधा मिळणार आहेत. अर्ज प्रक्रिया 28 ऑगस्ट 2025 पासून सुरू होईल आणि 27 सप्टेंबर 2025 पर्यंत चालेल. GATE स्कोअर असलेल्या अभियंत्यांनी आणि पात्र उमेदवारांनी ही संधी गमावू नये व वेळेत अर्ज करावा.

पदाचे नाव व तपशील:

संस्था: एअरपोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया (AAI)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ज्युनियर एक्झिक्युटिव (Architecture) 11
2 ज्युनियर एक्झिक्युटिव (Engineering‐Civil) 199
3 ज्युनियर एक्झिक्युटिव (Engineering‐Electrical) 208
4 ज्युनियर एक्झिक्युटिव (Engineering‐ Electronics) 527
5 ज्युनियर एक्झिक्युटिव (IT) 31
Total   976

शैक्षणिक पात्रता: संबंधित शाखेतील B.E./B.Tech/समान पदवी किंवा MCA (IT पदासाठी).
उमेदवाराकडे GATE 2023, 2024 किंवा 2025 चे वैध स्कोअर असणे आवश्यक.
अंतिम वर्षातील विद्यार्थी देखील पात्र, परंतु निकाल प्रमाणपत्र अर्ज पडताळणीवेळी सादर करणे आवश्यक.

वयोमर्यादा: कमाल वय: 27 वर्षे (27.09.2025 पर्यंत).
मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती-जमाती, दिव्यांग व माजी सैनिकांना शासकीय नियमांनुसार सवलत.

पगार व सुविधा:
पे-स्केल: ₹40,000 – 1,40,000/- (IDA पद्धतीने).
वार्षिक CTC अंदाजे ₹13 लाख.
भत्ते, HRA, वैद्यकीय सुविधा आणि निवृत्तीवेतन योजना लागू.

अर्ज शुल्क: ₹300 (SC/ST/PwBD/महिला व AAI अप्रेंटिससाठी सूट)

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

📅 महत्वाच्या तारखा:
ऑनलाईन अर्ज सुरू: 28 ऑगस्ट 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 27 सप्टेंबर 2025

🔗 महत्त्वाच्या लिंक्स:

जाहिरात PDF येथे क्लिक करा
Online अर्ज  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

निवड प्रक्रिया: निवड GATE स्कोअरच्या आधारे.
शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांची अर्ज पडताळणी केली जाईल.
इलेक्ट्रॉनिक्स पदासाठी निवड झाल्यानंतर 6 महिन्यांचे प्रशिक्षण व ₹7 लाखांचा बॉंड आवश्यक.

तयAriसाठी टिप्स:

✍️ १. GATE सिलेबसवर फोकस करा – तुमच्या शाखेचा पूर्ण सिलेबस नीट वाचा व महत्त्वाच्या टॉपिक्सवर जास्त लक्ष द्या.

✍️ २. मागील प्रश्नपत्रांचा सराव करा – गेल्या ५–१० वर्षांच्या GATE प्रश्नपत्रे सोडवून पॅटर्न समजून घ्या.

✍️ ३. वेळेचे नियोजन करा – दररोज ठराविक वेळ अभ्यासासाठी राखून ठेवा व रिव्हिजनला प्राधान्य द्या.

✍️ ४. कॉन्सेप्ट क्लिअर ठेवा – फक्त फॉर्म्युला न पाठ करता त्यामागील संकल्पना समजून घ्या.

✍️ ५. मॉक टेस्ट द्या – ऑनलाइन मॉक टेस्टद्वारे स्पीड आणि अचूकता तपासा.

✍️ ६. अपडेटेड राहा – AAI आणि GATE संबंधित अधिकृत नोटिफिकेशन व वेबसाईट्स नियमित तपासा.

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा
HPCL Bharti 2025: हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये 234 जागांसाठी भरती Supreme Court Bharti 2025: भारतीय सर्वोच्च न्यायालयात 90 जागांसाठी भरती