IBPS Clerk Bharti 2025 ही मेगाभरती जाहीर झाली असून, बँकिंग क्षेत्रात नोकरीच्या शोधात असलेल्या लाखो उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. IBPS (Institute of Banking Personnel Selection) मार्फत देशभरातील विविध राष्ट्रीयकृत बँकांमध्ये लिपिक (Clerk) पदासाठी 10277 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. संगणक साक्षरता अनिवार्य असून, संगणक विषयाचे शिक्षण घेतलेले उमेदवार पात्र ठरतील. या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांची निवड पूर्व परीक्षा (Prelims), मुख्य परीक्षा (Mains) आणि कागदपत्र पडताळणीच्या आधारे केली जाणार आहे. उमेदवारांचे वय 01 ऑगस्ट 2025 रोजी 20 ते 28 वर्षांदरम्यान असावे. मागासवर्गीय उमेदवारांना शासन नियमांनुसार वयोमर्यादेत सूट मिळणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2025 असून, संपूर्ण अर्ज प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट www.ibps.in वर जाऊन सविस्तर जाहिरात वाचून लवकर अर्ज करावा.
पदांचा तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | लिपिक | 10277 |
| Total | 10277 |
शैक्षणिक पात्रता:
1. कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतो.
2. संगणक साक्षरता अनिवार्य आहे. उमेदवारांकडे संगणक विषयाचे:
प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे किंवा
हायस्कूल / कॉलेज / संस्थामध्ये संगणक / माहिती तंत्रज्ञान हा विषय शिकलेला असावा.
वयोमर्यादा:
20 ते 28 वर्षे (01 ऑगस्ट 2025 रोजी गणना)
मागास प्रवर्गासाठी:
SC/ST: 5 वर्षे सवलत
OBC: 3 वर्षे सवलत
अर्ज फी:
General/OBC ₹850/-
SC/ST/PWD/ExSM ₹175/-
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारतभर बँकांमध्ये नियुक्ती केली जाईल.
महत्त्वाच्या तारखा:
ऑनलाईन अर्जाची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2025
PET (Pre-Exam Training) सप्टेंबर 2025
पूर्व परीक्षा (Prelims) ऑक्टोबर 2025
मुख्य परीक्षा (Mains) नोव्हेंबर 2025
महत्त्वाच्या लिंक्स:
| जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| Online अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
- अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या – www.ibps.in
- “CRP Clerks-XV” लिंकवर क्लिक करा
- नवीन यूजर रजिस्ट्रेशन करा
- अर्ज फॉर्म भरून फोटो व स्वाक्षरी अपलोड करा
- आवश्यक फी भरावी (ऑनलाइन)
- अर्ज सबमिट करून त्याची प्रिंट घ्या
तयAriसाठी टिप्स:
1. परीक्षा पद्धती समजून घ्या
Prelims: English Language, Numerical Ability, Reasoning Ability (एकूण 100 प्रश्न, 60 मिनिटे)
Mains: General/Financial Awareness, General English, Reasoning Ability & Computer Aptitude, Quantitative Aptitude (एकूण 190 प्रश्न, 160 मिनिटे)
2. Daily Study Schedule तयार करा
प्रत्येक विषयासाठी विशिष्ट वेळ द्या.
दररोज कमीत कमी 3–4 तास अभ्यास करा.
3. NCERT + बँकिंग बेसिक पुस्तकांचा अभ्यास करा
Quantitative Aptitude: R.S. Aggarwal, Fast Track Arithmetic
Reasoning: Verbal & Non-verbal Reasoning – R.S. Aggarwal
English: Wren & Martin + Daily Vocabulary
General Awareness: नियमित चालू घडामोडी वाचत रहा (MN नोकरी, PIB, RBI updates)
4. Mock Tests आणि Previous Year Papers सोडवा
रोज एक Mock Test सोडवा.
मागील वर्षांचे पेपर्स सोडवून परीक्षा पॅटर्न समजून घ्या.
5. Study Plan ला नियमित फॉलो करा
टाइमटेबल प्रमाणे consistency ठेवा.
शंका आल्यास YouTube चॅनेल किंवा टेलिग्राम ग्रुप्सचा वापर करा.
6. स्मार्टफोनचा योग्य वापर करा Testbook, Adda247, Oliveboard सारख्या अॅप्स वापरा.
चालू घडामोडींचे PDF दर आठवड्याला वाचा.
7. स्वतःवर विश्वास ठेवा आणि सकारात्मक राहा
दररोज थोडी विश्रांती, व्यायाम आणि झोप आवश्यक आहे.
आत्मविश्वास टिकवणे हे यशासाठी तितकेच महत्त्वाचे आहे.
लक्षात ठेवा: IBPS Clerk ही स्पर्धा परीक्षा आहे, फक्त अभ्यासच नव्हे तर स्मार्ट प्लॅनिंगही गरजेची आहे.