ठाणे महानगरपालिका (Thane Municipal Corporation) मार्फत 2025 मध्ये मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 1773 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीमध्ये गट क आणि गट ड पदांचा समावेश असून त्यामध्ये सहायक परवाना निरीक्षक, लिपिक, कनिष्ठ अभियंता, नर्स तसेच विविध तांत्रिक आणि प्रशासकीय पदे आहेत. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता 10वी, 12वी, पदवी, अभियांत्रिकी पदवी, नर्सिंग, फार्मसी, DMLT, MSc अशा विविध शाखांनुसार निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी 02 सप्टेंबर 2025 पूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे. वयोमर्यादा साधारणपणे 18 ते 38 वर्षे असून मागासवर्गीय उमेदवारांना व अनाथांना शिथिलता दिली आहे. अर्ज शुल्क सामान्य प्रवर्गासाठी ₹1000, तर मागास प्रवर्ग आणि अनाथ उमेदवारांसाठी ₹900 आहे. माजी सैनिकांना अर्ज शुल्कातून सूट आहे. ही भरती प्रक्रिया ठाणे महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये होणार असून, स्थानिक तसेच इतर उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. इच्छुकांनी वेळेत अर्ज करून तयारी सुरू करावी.
पदांचे नाव व तपशील:
संस्था – ठाणे महानगरपालिका (TMC)
एकूण जागा – 1773
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | गट क व गट ड (सहायक परवाना निरीक्षक, लिपिक, कनिष्ठ अभियंता, नर्स आणि इतर पदे) | 1773 |
| Total | 1773 |
शैक्षणिक पात्रता: 10वी / 12वी, पदवीधर, इंजिनिअरिंग पदवी, GNM / B.Sc / DMLT / MSc / B.Pharm
वयोमर्यादा: 02 सप्टेंबर 2025 रोजी वय 18 ते 38 वर्षे
मागासवर्गीय / अनाथ / आ.दु.घ उमेदवारांना 5 वर्षे सूट
नोकरी ठिकाण: ठाणे महानगरपालिका, ठाणे
अर्ज करण्याची पद्धत: इच्छुक उमेदवारांनी फक्त Online पद्धतीने अर्ज करावा.
अर्ज शुल्क: अमागास प्रवर्ग – ₹1000/-
मागास प्रवर्ग व अनाथ – ₹900/-
माजी सैनिक – फी नाही
महत्त्वाच्या तारखा:
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 सप्टेंबर 2025
परीक्षा तारीख – नंतर जाहीर होईल
महत्त्वाच्या लिंक्स:
| जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| Online अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
तयAriसाठी टिप्स:
- अभ्यासक्रम नीट समजून घ्या – प्रत्येक पदासाठी वेगळा अभ्यासक्रम असतो. जाहिरातीनुसार अभ्यासक्रम पाहून तयारी सुरू करा.
- दररोज ठराविक वेळ अभ्यासासाठी द्या – किमान 6 ते 8 तास अभ्यास करून विषयांची पुनरावृत्ती करा.
- सामान्य ज्ञान व चालू घडामोडी (Current Affairs) यावर विशेष लक्ष द्या. महाराष्ट्रातील घडामोडी, शासन योजना, महत्त्वाचे निर्णय यांचा अभ्यास करा.
- मागील प्रश्नपत्रिका सोडवा – पूर्वीच्या महानगरपालिका व इतर भरती परीक्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवल्यास परीक्षेच्या पद्धतीची सवय होते.
- वेळ व्यवस्थापन शिका – MCQ प्रश्नपत्रिका सोडवताना वेळेचे नियोजन फार महत्त्वाचे असते. रोज Mock Test द्या.
- आरोग्याची काळजी घ्या – अभ्यासाबरोबरच शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले ठेवा.