IBPS RRB भरती 2025 | ऑफिस असिस्टंट व ऑफिसर पदांसाठी अर्ज सुरू – पात्रता, तारखा व संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now

सरकारी नोकरीची संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी मोठा आनंदाचा क्षण आला आहे. IBPS RRB भरती 2025 जाहीर झाली असून, ग्रामीण बँकांमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी उमेदवारांसमोर आली आहे. या भरतीतून ऑफिस असिस्टंट (Multipurpose) तसेच ऑफिसर स्केल I, II आणि III पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत.
अर्ज प्रक्रिया १ सप्टेंबर २०२५ पासून सुरू होणार असून, २१ सप्टेंबर २०२५ हा शेवटचा दिवस आहे. ही नोकरी केवळ पगार आणि स्थिरता देणारी नाही, तर गावागावातील लोकांशी जोडून काम करण्याची, त्यांच्या जीवनात प्रत्यक्ष बदल घडवण्याचीही संधी आहे. बँकिंग सेवा ग्रामीण भागात पोहोचवण्यात या पदांचा मोठा वाटा असल्याने उमेदवारांना करिअरसह समाजसेवेचीही संधी मिळणार आहे.
जर तुम्ही पदवीधर असाल, स्थिर नोकरी हवी असेल आणि बँकिंग क्षेत्रात आपलं भविष्य घडवायचं असेल, तर ही भरती नक्कीच गमावू नका.

पदाचे नाव व तपशील

संस्था – इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अंतर्गत – ग्रामीण भागातील 43+ प्रादेशिक ग्रामीण बँका (RRBs)

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ऑफिस असिस्टंट (Multipurpose) 7,972
2 ऑफिसर स्केल-I (Assistant Manager) 3,907
3 ऑफिसर स्केल-II (General Banking Officer) (Manager) 854
4 ऑफिसर स्केल-II (IT) 87
5 ऑफिसर स्केल-II (CA) 69
6 ऑफिसर स्केल-II (Law) 48
7 ऑफिसर स्केल-II (Treasury Manager) 16
8 ऑफिसर स्केल-II (Marketing Officer) 15
9 ऑफिसर स्केल-II (Agriculture Officer) 50
10 ऑफिसर स्केल-III 199

शैक्षणिक पात्रता:
ऑफिस असिस्टंट (Multipurpose): कोणत्याही शाखेतील पदवी, स्थानिक भाषेचे ज्ञान, संगणकाचे प्राथमिक ज्ञान अनुभव आवश्यक नाही
ऑफिसर स्केल-I: (Assistant Manager) कोणत्याही शाखेतील पदवी (शेती, व्यवस्थापन, आयटी, कायदा, अर्थशास्त्र, लेखाशास्त्र यांना प्राधान्य), स्थानिक भाषेचे ज्ञान, संगणकाचे प्राथमिक ज्ञान अनुभव आवश्यक नाही
ऑफिसर स्केल-II (General Banking Officer): कोणत्याही शाखेतील पदवी (50% गुण आवश्यक), बँकिंग/फायनान्स/व्यवस्थापन/शेती/कायदा/अर्थशास्त्र/लेखाशास्त्र यांना प्राधान्य किमान 2 वर्षे अधिकारी म्हणून
ऑफिसर स्केल-II (IT Officer): कॉम्प्युटर/IT/इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन पदवी (50% गुण) 1 वर्ष
ऑफिसर स्केल-II: (Chartered Accountant) ICAI कडून CA पात्रता 1 वर्ष
ऑफिसर स्केल-II: (Law Officer) कायद्याची पदवी (50% गुण) 2 वर्षे (वकील किंवा कायदा अधिकारी)
ऑफिसर स्केल-II: (Treasury Manager) CA किंवा फायनान्समधील MBA 1 वर्ष
ऑफिसर स्केल-II: (Marketing Officer) मार्केटिंगमधील MBA 1 वर्ष
ऑफिसर स्केल-II: (Agricultural Officer) शेती/पशुसंवर्धन/बागायती/मत्स्यपालन/फॉरेस्ट्री पदवी (50% गुण) 2 वर्षे
ऑफिसर स्केल-III: (Senior Manager) कोणत्याही शाखेतील पदवी (50% गुण), बँकिंग/फायनान्स/व्यवस्थापन/शेती/कायदा/अर्थशास्त्र/लेखाशास्त्र यांना प्राधान्य किमान 5 वर्षे अधिकारी म्हणून

अर्ज करण्याची पद्धत – फक्त ऑनलाइन अर्ज

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारतातील प्रादेशिक ग्रामीण बँका (राज्यानुसार)

अर्ज शुल्क – SC/ST/PwBD/ESM साठी ₹175/- व इतर सर्वांसाठी ₹850/-

वयोमर्यादा:
ऑफिस असिस्टंट: 18 ते 28 वर्षे
ऑफिसर स्केल-I: 18 ते 30 वर्षे
ऑफिसर स्केल-II: 21 ते 32 वर्षे
ऑफिसर स्केल-III: 21 ते 40 वर्षे

महत्त्वाच्या तारखा:
अर्ज सुरू: 01 सप्टेंबर 2025
शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2025
प्री-एग्झाम ट्रेनिंग: नोव्हेंबर 2025
प्राथमिक परीक्षा: नोव्हेंबर / डिसेंबर 2025
मुख्य परीक्षा: डिसेंबर 2025 / जानेवारी 2026
मुलाखत (Officers): जानेवारी / फेब्रुवारी 2026
प्रोव्हिजनल अलॉटमेंट: फेब्रुवारी / मार्च 2026

महत्त्वाच्या लिंक्स:

जाहिरात PDF येथे क्लिक करा
Online अर्ज  पद क्र. 1- येथे क्लिक करा / पद क्र 2 ते 10 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

IBPS RRB भरती 2025 – निवड प्रक्रिया

1. ऑफिस असिस्टंट (Multipurpose)
प्रथम प्राथमिक परीक्षा (Prelims) होईल.
त्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुख्य परीक्षा (Mains) घेण्यात येईल.
या पदासाठी मुलाखत नाही. मुख्य परीक्षेत मिळालेल्या गुणांवर अंतिम निवड होईल.

2. ऑफिसर स्केल-I (Assistant Manager)
सर्वात आधी प्राथमिक परीक्षा होईल.
त्यानंतर पात्र उमेदवारांची मुख्य परीक्षा घेतली जाईल.
शेवटी मुलाखत (Interview) होईल.
या तिन्ही टप्प्यांच्या गुणांनुसार उमेदवारांची निवड केली जाईल.

3. ऑफिसर स्केल-II व स्केल-III (Manager व Senior Manager)
या पदांसाठी एकच ऑनलाइन मुख्य परीक्षा घेण्यात येईल.
परीक्षेत पात्र ठरलेल्यांना मुलाखत द्यावी लागेल.
लेखी परीक्षा + मुलाखत या गुणांची बेरीज करून अंतिम यादी तयार होईल.

तयारीसाठी टिप्स:

1. सिलेबस नीट समजून घ्या
सर्वप्रथम अधिकृत जाहिरातीत दिलेला सिलेबस नीट वाचा. कोणत्या विषयावर किती प्रश्न विचारले जातात, कोणत्या भागात जास्त गुण मिळू शकतात हे ओळखा.

2. दररोज ठराविक वेळ अभ्यासाला द्या
तयारीत सातत्य खूप महत्त्वाचं आहे. रोज २-३ तास अभ्यास करा. विषय वेगवेगळ्या वेळेला विभागून घेतला तर लक्ष जास्त केंद्रित होतं.

3. मागील वर्षांचे पेपर्स सोडवा
गेल्या काही वर्षांचे प्रश्नपत्रिका सोडवल्या की प्रश्नांचा पॅटर्न समजतो आणि वेळेचे व्यवस्थापन शिकायला मिळते.

4. मॉक टेस्ट द्या
ऑनलाइन मॉक टेस्ट देणे ही खरी तयारी आहे. सुरुवातीला कमी गुण आले तरी निराश होऊ नका. त्यातून आपली चूक समजून घ्या आणि सुधारणा करा.

5. गणित आणि रीझनिंगवर पकड मजबूत ठेवा
हे दोन विषय स्कोअरिंग आहेत. शॉर्टकट्स आणि ट्रिक्स शिका, त्यामुळे वेळ वाचेल.

6. करंट अफेअर्स वाचा
बँकिंग, अर्थव्यवस्था आणि चालू घडामोडी यावर आधारित प्रश्न येतात. दररोज वर्तमानपत्र वाचा आणि नोट्स तयार करा.

7. संगणक ज्ञान आणि इंग्रजी/हिंदी भाषेकडे दुर्लक्ष करू नका
या विषयात कमी वेळेत चांगले गुण मिळवता येतात. बेसिक प्रश्न जास्त विचारले जातात, त्यामुळे नियमित सराव पुरेसा आहे.

8. आराम आणि आत्मविश्वास ठेवा
फक्त अभ्यास करून चालणार नाही. वेळेवर झोप घेणे, सकारात्मक दृष्टी ठेवणे आणि स्वतःवर विश्वास ठेवणे हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे.

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा
HPCL Bharti 2025: हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये 234 जागांसाठी भरती Supreme Court Bharti 2025: भारतीय सर्वोच्च न्यायालयात 90 जागांसाठी भरती