भू-अभिलेख विभाग भरती 2025 | Bhumi Abhilekh Bharti 2025 – 903 Surveyor पदे

WhatsApp Group Join Now

आजच्या काळात सरकारी नोकरी ही अनेक तरुणांची पहिली पसंती ठरते. सुरक्षित नोकरी, चांगलं वेतनमान, सामाजिक प्रतिष्ठा आणि भविष्यातील स्थैर्य या सगळ्या गोष्टींसाठी सरकारी नोकरीचं महत्त्व खूप मोठं आहे. महाराष्ट्र शासनाच्या भू-अभिलेख विभागातर्फे नुकतीच 903 पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
ही भरती विशेषतः भकूरमापक (Surveyor) या पदासाठी असून, सिव्हिल इंजिनियरिंग डिप्लोमा किंवा सर्व्हेक्षण क्षेत्रातील ITI पार केलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. ग्रामीण भागातील शेतजमिनींचे नकाशे, भू-अभिलेखाचे मोजमाप व इतर तांत्रिक कामं यामध्ये थेट सहभाग घेण्याची संधी या नोकरीत मिळते.
सरकारी सेवेत प्रवेश करून स्वतःच्या करिअरसोबतच राज्याच्या विकासात हातभार लावू इच्छिणाऱ्या युवक-युवतींसाठी ही भरती नक्कीच आशादायक आहे.

पदाचे नाव व तपशील

पद क्र. पदाचे नाव विभाग, प्रदेश. / पद संख्या
1 भूकरमापक
पुणे प्रदेश 83
कोकण प्रदेश, मुंबई 259
नाशिक प्रदेश 124
छ. संभाजीनगर 210
अमरावती प्रदेश 117
नागपूर प्रदेश 110
Total    903

शैक्षणिक पात्रता
उमेदवाराकडे सिव्हिल इंजिनियरिंग डिप्लोमा असणे आवश्यक किंवा
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे (ITI) दोन वर्षांचे सर्व्हेक्षण विषयाचे प्रमाणपत्र
मराठी टंकलेखन (30 श.प्र.मि.) व इंग्रजी टंकलेखन (40 श.प्र.मि.) प्रमाणपत्र आवश्यक (नसल्यास दोन वर्षांत पूर्ण करणे बंधनकारक).

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

वयोमर्यादा
सर्वसाधारण उमेदवारांसाठी – 18 ते 38 वर्षे
मागासवर्गीय/आरक्षित उमेदवारांसाठी – शासकीय नियमानुसार सवलत लागू

अर्ज शुल्क
ओपन वर्ग – ₹1000/-
मागास वर्ग – ₹900/-
माजी सैनिक – शुल्क नाही

अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन अर्ज करावा.

वेतनश्रेणी – ₹19,900 ते ₹63,200

परीक्षा पद्धती
एकूण 200 गुणांची संगणक आधारित ऑनलाइन परीक्षा होईल.
इंग्रजी – 50 गुण
मराठी – 50 गुण
सामान्य ज्ञान – 50 गुण
बौद्धिक चाचणी/अंकगणित – 50 गुण
एकूण वेळ – 120 मिनिटे

महत्त्वाच्या तारखा :
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 24 ऑक्टोबर 2025
ऑनलाईन परीक्षा तारीख – 13 व 14 नोव्हेंबर 2025

महत्त्वाच्या लिंक्स :

जाहिरात PDF येथे क्लिक करा
Online अर्ज येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

निवड प्रक्रिया – ऑनलाइन परीक्षेत किमान 45% गुण आवश्यक, त्यानंतर गुणवत्तेनुसार व आरक्षणानुसार यादी तयार केली जाईल.

उमेदवारांसाठी सूचना

  • 1. उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
    अर्ज संकेतस्थळ : ibpsreg.ibps.in/gomsep25 व mahabhumi.gov.in
    अर्ज करण्याची मुदत : 01 ऑक्टोबर 2025 ते 24 ऑक्टोबर 2025
  • 2. एका उमेदवाराने फक्त एका विभागासाठीच अर्ज करावा. एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास शेवटचा अर्ज वैध मानला जाईल.
  • 3. अर्ज सादर करताना दिलेली माहिती पूर्णपणे खरी असणे आवश्यक आहे. चुकीची / खोटी माहिती आढळल्यास अर्ज बाद होईल.
  • 4. उमेदवारांनी अर्ज सादर करतानाच ऑनलाईन परीक्षा शुल्क भरावे.
    ओपन वर्ग : ₹1000/-, मागास वर्ग : ₹900/-
    माजी सैनिक : शुल्क माफ
  • 5. अर्ज करताना शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करण्याची गरज नाही, परंतु सर्व माहिती अचूक भरावी.
  • 6. ऑनलाईन अर्ज एकदा सबमिट केल्यानंतर त्यामध्ये बदल करता येणार नाही. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक तपासावे.
  • 7. उमेदवारांची परीक्षा ही अर्जात नमूद केलेल्या पात्रतेच्या आधारे घेतली जाणार आहे. पात्रता पडताळणी नंतर होईल.
  • 8. परीक्षेच्या वेळी उमेदवाराने मोबाईल, कॅल्क्युलेटर, स्मार्ट वॉच, इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरल्यास परीक्षा रद्द केली जाईल.
  • 9. उमेदवारांकडे महाराष्ट्र राज्याचे वैध अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) असणे आवश्यक आहे.
  • 10. परीक्षेचे प्रवेशपत्र (Admit Card) उमेदवारांनी स्वतः संकेतस्थळावरून डाउनलोड करणे बंधनकारक आहे. पोस्टाद्वारे पाठवले जाणार नाही.
  • 11. अंतिम निवडीनंतर उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रे जसे की – शैक्षणिक प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्र, नॉन-क्रीमीलेअर (लागू असल्यास), वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र – सादर करणे आवश्यक राहील.
  • 12. अपात्र ठरलेला उमेदवार कोणत्याही टप्प्यावर निवड प्रक्रियेतून बाद केला जाईल.

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा
HPCL Bharti 2025: हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये 234 जागांसाठी भरती Supreme Court Bharti 2025: भारतीय सर्वोच्च न्यायालयात 90 जागांसाठी भरती