न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेड (NIACL), भारतातील अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील सर्वसाधारण विमा कंपनी, यांनी 550 प्रशासकीय अधिकारी (Administrative Officers – Generalists & Specialists) Scale-I पदांच्या भरतीची घोषणा केली आहे. ही भरती देशभरातील पात्र उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी असून अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील. विविध प्रवर्गांमध्ये Risk Engineers, Automobile Engineers, Legal Specialists, Accounts Specialists, AO (Health), IT Specialists, Business Analysts, Company Secretary, Actuarial Specialists आणि Generalists अशी पदे उपलब्ध आहेत. उमेदवारांकडे आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अनुभव (लागू असल्यास) असणे गरजेचे आहे. निवड प्रक्रिया तीन टप्प्यांत होणार असून त्यात प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत यांचा समावेश आहे. अंतिम निवड मुख्य परीक्षा व मुलाखतीतील गुणांच्या आधारे केली जाईल. या भरतीअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतनमानासह (सुमारे ₹90,000/- प्रति महिना) विविध भत्ते आणि सुविधा मिळतील.
पदाचे नाव व तपशील:
संस्था: न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेड (NIACL)
| पद क्र. | पदाचे प्रकार | पद संख्या |
| 1 | जोखीम अभियंते (Risk Engineers) | 50 |
| 2 | ऑटोमोबाईल अभियंते (Automobile Engineers) | 75 |
| 3 | कायदा तज्ञ (Legal Specialists) | 50 |
| 4 | लेखा तज्ञ (Accounts Specialists) | 25 |
| 5 | प्रशासकीय अधिकारी – आरोग्य (AO – Health) | 50 |
| 6 | आयटी तज्ञ (IT Specialists) | 25 |
| 7 | व्यवसाय विश्लेषक (Business Analysts) | 75 |
| 8 | कंपनी सचिव (Company Secretary) | 02 |
| 9 | अॅक्चुअरियल तज्ञ (Actuarial Specialists) | 05 |
| 10 | सर्वसाधारण प्रशासकीय अधिकारी (Generalists) | 193 |
| Total | 550 |
शैक्षणिक पात्रता:
Generalists: कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर किमान 60% गुणांसह (SC/ST/PwBD साठी 55%).
Specialists: संबंधित विषयातील आवश्यक पदवी/पदव्युत्तर पदवी आणि निर्दिष्ट किमान गुण. (उदा. अभियंता, कायदा, वित्त, वैद्यकीय, IT इ.)
वयोमर्यादा: 01 ऑगस्ट 2025 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज फी: SC/ST/PwBD: ₹100/- (फक्त इंटिमेशन चार्ज)
इतर सर्व उमेदवार: ₹850/- (फी + इंटिमेशन चार्ज)
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
📊 एकूण रिक्त जागा: एकूण पदे: 550
सामान्य प्रवर्ग: 222
OBC: 148
SC: 83
ST: 42
EWS: 55
(PwBD प्रवर्गासाठीही जागा राखीव आहेत)
वेतनमान: प्रारंभिक मूलभूत वेतन: ₹50,925/-
एकूण मासिक वेतन (मेट्रो सेंटर्स): अंदाजे ₹90,000/- + इतर भत्ते.
महत्त्वाच्या तारखा:
ऑनलाइन नोंदणी व फी भरण्याची तारीख: 07 ऑगस्ट 2025 ते 30 ऑगस्ट 2025
प्राथमिक परीक्षा (Phase-I): 14 सप्टेंबर 2025
मुख्य परीक्षा (Phase-II): 29 ऑक्टोबर 2025
महत्त्वाच्या लिंक्स:
| जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| Online अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
निवड प्रक्रिया:
1. प्राथमिक परीक्षा (Phase-I) – ऑनलाइन ऑब्जेक्टिव्ह टेस्ट
2. मुख्य परीक्षा (Phase-II) – ऑब्जेक्टिव्ह + वर्णनात्मक टेस्ट
3. मुलाखत (Interview)
तयAriसाठी टिप्स:
■ जाहिरात नीट वाचा – पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा पॅटर्न आणि सिलॅबस नीट समजून घ्या.
■ अभ्यासाची वेळापत्रक तयार करा – Reasoning, Quant, English आणि General Awareness यासाठी ठराविक वेळ द्या.
■ मागील वर्षांचे पेपर्स सोडवा – प्रश्नांचा प्रकार आणि कठीणतेचा स्तर समजतो.
■ ऑनलाईन मॉक टेस्ट द्या – स्पीड आणि अचूकता वाढवण्यासाठी दररोज सराव करा.
■ करंट अफेअर्स वाचा – मागील 6 महिन्यांचे चालू घडामोडी आणि विमा/बँकिंग क्षेत्रातील बातम्या वाचा.
■ कमजोर विषयांवर काम करा – रोज थोडा वेळ त्या विषयासाठी ठेवा.
■ आरोग्याची काळजी घ्या – योग्य आहार, झोप आणि मानसिक तंदुरुस्ती ठेवा.